बिगर भाजप पक्षांनी एकत्र संवाद करणे गरजेचे : शरद पवार

0

मुंबई : पंतप्रधानपदासाठी कुणाला प्रोजेक्ट करायचे अथवा नाही यावर नंतर विचार आणि चर्चा करू. त्यापेक्षा बिगर भाजप पक्षांमध्ये संवादाची फेरी सुरू झाली पाहिजे. या वेळी सर्व पक्षांच्या मनात राष्ट्रहिताचा मुद्दा सर्वोच्च प्राधान्याचा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा दावा खोडून काढला आहे. देशातील २४ टक्के जनतेला राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहायचे आहे, असा दावा काँग्रेसने केला अाहे. यासंदर्भात छेडले असता पवारांनी काँग्रेसच्या दाव्याला फारसे महत्त्व दिले नाही.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात विरोधकांना एकजूट करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, पाठिंबा मिळवण्यासाठी ते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचीही भेट घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.