पुणे : कुख्यात गुन्हेगाराचा भरदिवसा डुकर खिंडीत हत्याराने वार करुन खून करण्यात आला आहे.
जग्या उर्फ जगदीश पारध्ये (28, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास काही नागरिकांना डुक्कर खिंड परिसरात एक मृतदेह दिसला. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्यांनी याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली.
ओळख पटविण्याचे काम सुरू असताना हा मृतदेह कुख्यात गुंड जग्या पारधे याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना आणून ओळख पटवून घेतली.
दरम्यान खुनाच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. पुणे पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.