नवी दिल्ली ः ”प्रत्येकवेळी बंदुकीनेच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जाते आहे. तर, कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचा बळी घेत आहेत. तेव्हा सीमवेरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा,” असे खोचक सल्ला सामनाच्या अग्रेलखातून विरोधकांना दिला आहे.
अग्रलेखातून शिवसेनेने म्हटलंय की, ”खलिस्तानचा विषय आज भाजपावाले नुसते उकरून काढत नाहीत, तर त्यांना ठिणगी टाकून पंजाबमध्ये स्वतःचे राजकारण सुरू करायचे आहे. पंजाबमधील थडगी पुन्हा उकरून काढली तर देशाला भारी पडेल”, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
”देशासाठी बलिदान देणे, त्याग करणे हा छ.शिवरायांच्या महाराष्ट्राची परंपरा आहे. पण, राज्यकर्ते असे किती बळी व बलिदान देणार आहेत? महाराष्ट्रासह देशभरातील विरोधकांना चिरडण्यासाठी भाजपा सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहेत. मग, ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही”, असा प्रश्न शिवसेनेने विरोधकांना विचारला आहे.