आता शशांक केतकरही होणार बाबा

0

मुंबई : अनुष्का शर्मा आणि करिना कपूरनंतर आता मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरनेही गोड बातमी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. शशांक लवकरच बाबा होणार आहे. त्याने ही बातमी ख्रिसमसचा दिवस पाहून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

शशांकने पत्नी प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शशांकने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आम्हाला हे माहिती होतं की, सॅन्टा येतो आणि गिफ्ट्सचा वर्षाव करतो. आम्हाला हे माहीत नव्हतं की, आम्हालाही एक छान गिफ्ट मिळेल. या गिफ्टसाठी आभारी आहोत. आम्हा तिघांकडूनही हॉलिडे सीझनच्या शुभेच्छा’.असे शशांकने त्याच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

शशांकच्या या पोस्टमुळे चाहत्यांनी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मराठीतील गोड जोडी म्हणून शशांक आणि प्रियंकाकडे पाहिलं जातं. ‘होणार सून मी  या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘श्री’ अर्थात, शशांक केतकर आणि प्रियांका ढवळे यांनी २०१७ मध्ये पुण्यात लग्न केलं. व्यवसायानं वकील असलेली प्रियांका आणि शशांक गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतात. २०१७मध्येच एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत त्याच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानसोबत दोन वर्षांपूर्वी शशांकचे लग्न झाले होते. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर वर्षभरातच ते दोघे वेगळे झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.