त्याशिवाय रस्ते व परिवहन मंत्रालय टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनवरील वाहतुक नियोजित वेळेपेक्षा जास्त असल्यास ते फ्री कारण्याबाबत विचार करीत आहे. यासाठी ग्रीन, यलो आणि रेड अशा तीन कलर कोड सिस्टम असतील. टोल प्लाझावरील ट्रॅफिक रेड लाईन ओलांडताच टोल प्लाझा फ्री करून ट्रॅफिक उघडले जाईल. दरम्यान, अद्याप पायलट प्रकल्प म्हणून त्याची चाचणी घेण्यात येत आहे.
यासोबतच, वाहनाचे कागदपत्र दाखविण्यासाठी लोकांना ट्रॅफिक पोलिसांना सामोरे जावे लागणार नाही, आरएफआयडीद्वारे वाहनाची कागदपत्रे स्कॅन केली जातील आणि तुम्हाला कुठेही थांबाण्याची आवश्यकता नाही. यामुळे पोलिस तसेच प्रवाश्यांचा वेळ वाचणार आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने म्हटले की, आता फास्टॅग लेनमध्ये वेटिंगचा कालावधी वेगाने कमी होत आहे, पूर्वी प्रतीक्षा कालावधी 464 सेकंद होता, आता तो कमी करून 150 सेकंद करण्यात आला आहे . म्हणजेच, फास्टॅग सारख्या इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंट सिस्टममुळे लोक बर्याच वेळेची बचत करीत आहेत