पिंपरी चिंचवडमध्ये रुग्ण संख्या वाढतेय! गेल्या 24 तासात 2065 नवीन रुग्ण

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (दि.12) शहरामध्ये 2065 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 2277 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या तुलनेत आज 212 नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने आणि सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 11 हजार 975 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2277 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 261 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 816 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 77 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 10 हजार 947 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 340 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 10 हजार 607 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 02 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आला आहे. यापैकी एक रुग्ण युएसए येथून आला आहे. तर एक जण दुबई येथून आला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.