सरकारी कामात अडथळा; नगरसेविकासह 11 जणांना अटक

0

पिंपरी : कोणत्याही परवानगी शिवाय, कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करुन पिंपरी-चिंचवड महापालिका शासकीय अधिकारी आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या कामात  अडथळा निर्माण केल्या प्रकरणी भाजपा नगरसेविका आशा शेडगे आणि त्यांच्या 10 समर्थकाविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणी अधिकारी प्रमोद रामकृष्ण निकम यांनी फिर्याद दिली आहे. तर नगरसेविका आशा शेडगे, समर्थक महिला पूजा अरविंद भंडारी, गौरी कमलाकर राजपाल, आशा जेशवाल, शितल महेश जाधव, जयश्री रामलिंग सनके, आशा तानाजी धायगुडे, संध्या रमेश गवळी, स्वप्नील भारत आहेर, संजय शंकर पवार आणि संजय सुखदेव शेडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेडगे आणि त्यांच्या समर्थकांनी आज दुपारी महापालिकेतील अधिकारी अशोक भालेकर यांच्या कार्यलयात जाऊन गोंधळ घातला. घोषणाबाजी करुन टेबलवर शाई आणि फुले टाकली.

आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालय बाहेर गोंधळ करुन त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सला जाण्यापासून अडवले. तसेच सुरक्षा रक्षकाला आणि पोलीस अंमलदार यांना धक्काबुकी केली. महापालिका आयुक्तांच्या  नामफलकावर शाई फेकत निषेध व्यक्त केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.