संदीप वाघेरे यांच्या वतीने रावण दहनाचा नेत्रदिपक सोहळा संपन्न

0
पिंपरी : गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने साजरा करण्यात आला. नवमहाराष्ट्र क्रिडांगणावर 70 फुटी भव्य रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याचे दहन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक निलेश बारणे, तुषार कामठे,  संतोष कुदळे, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, सुभाष वाघेरे, तानाजी वाघेरे, सुरेश शिंदे, संदीप कापसे, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.यावेळी सहभागी झालेल्या प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये लावणी, गरबा, चित्तथरारक प्रात्यक्षीकांबरोबर संगीताच्या तालावर सादर झालेल्या नृत्याअविष्काराने अबाल वृद्धांनी ठेका धरला. सायंकाळी 7 वाजल्यापासून परिसरातील नागरिकांनी क्रीडांगणाकडे गर्दी करायला सुरुवात केली. काही कालावधीतच क्रीडांगण गर्दीने भरून गेले.

70 फुटी रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजीत यांची भव्य प्रतीकृती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. आकर्षक विद्युत रोषणाई,डी.जे आदी करमणुकीच्या कार्यक्रमामुळे शेवटपर्यंत कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचला.

आयोजक संदीप वाघेरे म्हणाले, पिंपरी प्रभागाला खऱ्या अर्थाने स्मार्ट बनविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. पिंपरीगावच्या विकासाच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित झालेल्या अनेक कामांना वेग दिला. रावण दहनाच्या निमित्ताने समाजातील वाईट प्रवृतीचे दहन व्हायला हवे.

शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे,पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्या हस्ते रिमोटच्या साह्याने बाण मारून रावण दहनाचा नेत्रदिपक सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी पिंपरी येथील पोलीस, वाहतूक शाखा, अग्निशामक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य विभाग यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक पीसीएमटीचे माजी चेअरमन संतोष कुदळे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर अहिरराव यांनी केली. कार्यक्रमाचे संयोजनात युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे, शेखर अहिरराव, प्रवीण कुदळे, नितीन गव्हाणे, उमेश खंदारे, कुणाल सातव, सोनू कदम, राजेंद्र वाघेरे, सचिन वाघेरे, विठ्ठल जाधव, श्रीकांत वाघेरे, मयूर कचरे, अमोल गव्हाणे, रजना जाधव, अश्विनी लोहार, अपूर्वा खोचाडे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.