पहिल्याच दिवशी २२ हजार ४३७ पुणेकरांनी मेट्रोचा आनंद लुटला

0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन्ही मार्गावर २२ हजार ४३७ पुणेकरांनी मेट्रोच्या सफरीचा आनंद लुटला. यातून महामेट्रोला दिवशी ५ लाख ५३ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि फुगेवाडी ते पिंपरीचिंचवड हे १२ किलोमीटरचे मेट्रो मार्ग प्राधान्याने तयार केले. त्याचे उद्घाटन आज मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी तीन ते रात्री नऊ या सहा तासासाठी नागरिकांना मेट्रो प्रवासासाठी खुली झाली. त्यामुळे दुपारपासून सर्वच स्टेशनवर नागरिकांची गर्दी होती. मेट्रोच्या जवळपास सर्वच फेऱ्या हाऊसफूल झाल्या आहेत.

रात्री नऊ वाजता मेट्रोची शेवटची फेरी झाली, वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर १५ हजार ८४२ नागरिकांनी प्रवास केला. तर फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर ६ हजार ९९५ नागरिकांनी प्रवास केला. यातून महामेट्रोला ५ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक हेमंत सोनवणे म्हणाले, पहिल्या दिवळी मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभरात दोन्ही मार्गांवरून २२ हजार ४३७ जणांनी प्रवास केला आहे, तर दोन्ही मार्गावर प्रत्येकी १२ फेर्या झाल्या असून, त्यातून ५.५३ लाखाचे उत्पन्न मिळाले. उद्यापासून सकाळी ८ वाजता मेट्रो सेवा सुरू होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.