‘व्हॅलेंटाइन डे’ला प्रेयसीयवर चाकूने हल्ला

0
मुंबई : मुंबई येथील भोईवाडा परिसरात ‘व्हॅलेंटाइन डे’लाच एका माथेफिरूने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने चार वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भोईवाडा परिसरात भररस्त्यात रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ३५ वर्षीय महिलेवर राजू काळे या इसमाने चाकूने तीन ते चार वेळा वार केले.

राजू या महिलेला भेटल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. दरम्यान राजू याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली असून महिलेला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू हा या महिलेचा पूर्वी प्रियकर होता, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

दरम्यान, भोईवाड्यात गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हा हल्ला करण्यामागचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.