पुणे : एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे चाकण पोलीस ठाण्यातील एक अधिकारी पुणे एसीबीच्या रडारवर आला आहे. ही लाच कोणत्या कारणासाठी घेतली हे अद्याप समजू शकले नाही.
चाकण पोलीस ठाण्यातील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या संमतीनंतर खासगी व्यक्तीने लाच घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एका खासगी इसमाला 85 ते 90 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीने एका पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच घेतल्याची चर्चा आहे. मात्र, ज्या पोलीस अधिकाऱ्यासाठी लाच घेतली. तो अधिकारी सध्या तपासासाठी बीड येथे गेल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडे कसून चौकशी केली जात आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नादगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
(सविस्तर बातमी थोड्या वेळात)