सव्वा सहा कोटींची फसवणूक प्रकरणी एकाला अटक

0

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाची सोल सेलिंग एजंटने सहा कोटी 24 लाख 87 हजार 329 रुपयांची फसवणूक केली. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने सोल सेलिंग एजंट पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2014 ते डिसेंबर 2020 या कालावधीत स्टार सिटी गृहप्रकल्प, डुडुळगाव येथे घडला.

समर्थ प्रॉपर्टीजच्या प्रोप्रायटर सुप्रिया सचिन थोरात, मॅनेजर सचिन हनुमंत थोरात (दोघे रा. रेलविहार कॉलनी, बिजलीनगर, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कमल जयकिशन जेठाणी (वय 37, रा. औंध पुणे) यांनी 15 फेब्रुवारी 2022 रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेठाणी यांची डुडुळगाव येथे स्टार सिटी नावाची बांधकाम साईट आहे. त्यातील ए, बी आणि सी विंग मधील फ्लॅट विक्री करण्याचे काम आरोपींना देण्यात आले आहेत. त्याबाबत सोल सेलिंग एजंटचा करारनामा देखील करण्यात आला. त्यानुसार फ्लॅटच्या किमतीच्या सव्वा टक्के कमिशन आरोपींना देण्याचे ठरले होते. आरोपींनी संगनमताने बुकिंग करणा-या फ्लॅट धारकांकडून 27 लाख 80 हजार रुपये अनाधिकाराने स्वीकारून त्याचा हिशोब फिर्यादी यांना न देता सोल सेलिंग करारनाम्याचा भंग केला.

फ्लॅट बुकिंगची रक्कम जेठाणी यांच्या राजमाता कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यावर न भरता प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँक रावेत शाखा येथे जेठाणी यांच्या कंपनीचे बिगर तारखेचे लेटर पॅडवर बनावट संमतीपत्र तयार केले. त्याआधारे प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँकेत राजमाता कन्स्ट्रक्शन नावाने दुसरे समांतर चालू खाते उघडले. फ्लॅट बुकिंगचे पाच कोटी 97 लाख 7 हजार 329 रुपये रक्कम त्या बनावट खात्यावर जमा केली. एकूण सहा कोटी 24 लाख 87 हजार 329 रुपयांची आरोपींनी फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.