नवले पुलाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

0

पुणे : मुंबई बँगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक समोरील पाच ते सहा वाहनांना धडक दिली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळ सव्वासहाच्या सुमारास एक ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला असता नवले पुलाजवळ आल्यानंतर ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि त्याने समोर असलेल्या पाच ते सहा गाड्यांना जोराची धडक दिली.

या अपघातामध्ये काही चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर चार जण गंभीर जखमी आहेत. यातील तीन वाहनांचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे.

अपघाताची माहिती मिळतात सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  या अपघातामुळे मुंबई बँगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढली. तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय सिंहगड वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या काही काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.