कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या टोपे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गट ‘क’ आणि ‘ड’ च्या दहा हजार जागा भरण्यात येणार असून, ही प्रक्रियाही दोन महिन्यात संपवण्यात येईल. आशा वर्कर्सना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात आरोग्य करणाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. यामुळे तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी प्रशासन तयारीला लागले आहे.