पुणे, पिंपरी चिंचवड मधील ऑनलाईन शिक्षणही ३ दिवस बंद

फेडरेशन ऑफ स्कूल असोसिएशनचा निर्णय

0

पुणे : कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पद्धत पुढे आली.मात्र शाळांकडून त्यासाठी फी आकारली जाऊ लागली, अनेक शाळांनी त्याला पर्याय उपलब्ध करुन दिले. या परिस्थितीमध्ये अनेक शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे. पालक शाळेची फी भरेनासे झाले आहेत. त्यामुळे फी नाही तर शाळा नाही असे सांगत पुणे, पिंपरी चिंचवडसह चाकण आणि खेड मधील तब्बल १४८३ सर्व खाजगी शाळांनी मंगळवार दि.१५ ते १७ डिसेंबर (तीन दिवस) ऑनलाईन स्कूल बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ स्कूलस असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेने घेतला आहे.

शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यापुढे शिक्षण सुरू ठेवणे आम्हाला अशक्य आहे. त्यामुळे संघटनांनी ३ दिवसांचे शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या ३ दिवसात खाजगी शाळांचे शैक्षणिक कामकाज पूर्ण बंद राहील. या बंदच्या माध्यमातून राज्यातील खाजगी शाळांची दयनीय अवस्था सर्वांच्या नजरेत येईल म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी केवळ ३० ते ४० टक्केच पालक फी भरत असल्याने व शाळेचा सर्व खर्च फीवर अवलंबून असल्याने हा सर्वशालेय कारभार सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळत नाही.

महाराष्ट्र राज्यातील शाळांची आपली असमर्थता व दयनीय परिस्थिती दर्शविण्यासाठी आणि बेजबाबदार कारभारामुळेही पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, खेड मधील सर्व शाळांचे ऑनलाईन वर्ग ३ दिवस म्हणजेच दि.१५, १६ आणि १७ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.