यंदाच्या कार्तिकी वारीत मोजकेच वारकरी

पंढरपुरातून मानाच्या ३ दिंड्या ८ डिसेंबरला आंळदीत दाखल होणार 

0

पुणे ः करोनाच्या पार्श्वभुमीवर कार्तिकी वारीतील महत्वाचे कार्यक्रमात मोजकेच वारकरी असणार आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी जारी केला आहे. आळंदीत भक्तांची गर्दी टाळण्यासाठी आळंदीसहीत आजूबाजूच्या ११ गावांत ६ ते १४ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत.

कार्तिकी वारी ८ डिसेंबरपासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादळी ११ डिसेंबरला आणि संजिवनी समाधी सोहळा दिन १३ डिसेंबरला आहे. यावेळी पंढरपुरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडुरंग संत, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येक २० वारकऱ्यांनाच आळंदीत प्रवेश देण्यात आला आहे. या तिन्ही दिंड्या बसने ८ डिसेंबरला आळंदीत दाखल होणार आहेत.

६ ते १४ डिसेंबरच्या संचारबंदीच्या काळात पूजाअर्चेसाठी काही नियम आणि अटी घालण्यात आलेल्या आहेत. इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी, पूजा ५० जणांनाच उपस्थित राहण्याती परवानगी, इतर कार्यक्रमांना २०-३० जणांनाच उपस्थित असण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.