तरच धनंजय मुंडेंवर कारवाई होणार

0

पणजी : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची चौकशी होऊ द्या. यात मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले आहे.

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून पवार सध्या गोवा दौऱ्यावर असून, बुधवारी त्यांनी येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल विचारले.

पवार म्हणाले की, ‘काही जणांचा बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत.’

केंद्र सरकारने जी शेतकरीविरोधी विधेयके संमत केलेली आहेत, त्याचाही पवार यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला. पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, आमदार चर्चिल आलेमांव व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.