पुणे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात सध्या उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. पुण्यात लॉकडाऊन नकोच अशी भुमिका जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी त्यांची भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, मी पण लॉकडाऊनच्या विरोधात आहे. पण संख्या ज्या गतीने आणि ज्या पध्दतीने वाढते आहे त्या पध्दतीने 100 टक्के खासगी हॉस्पीटलमधील बेड ताब्यात घेतले तरी बेड मिळणे कठीण आहे. लोक ऐकतच नाहीत. कडक निर्बंध घातले तरी लोक ऐकतच नाहीत. एखाद्या घरात कोरोना रूग्ण असेल तरी देखील त्या घरातील इतरजण गावभर फिरतात. काही उपयोग होत नाही. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. त्यावेळी काय करणार.
दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील त्यांची भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, ससूनमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिका का आहे. अनावश्यक फिरणार्यांची संख्या अधिक आहे. लोकप्रतिनिधींनी काय केले पाहिजे. पोलिस फिरताना गर्दी कमी असते पण ते गेल्यावर लोक पुन्हा गर्दी करतात. लसीकरण वाढवले पाहिजे आणि कडक निर्बंध केले पाहिजे असे ते म्हणाले. तरूणांमध्ये संसर्ग वाढत असल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणले.
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, प्रशासनाची भुमिका लॉकडाऊन करा अशी असली तरी देखील लोकांना लॉकडाऊन नका आहे. त्यामुळे निर्बंध कडक करा तसेच काही खासगी हॉस्पीटल 100 टक्के कोविडसाठी घ्या. मतिमंद, दिव्यांग मुलांच्या लसीकरणाचा शासनाने निर्णय घ्यावा. फेसबुक पेज, सोशल मिडीयावर जनजागृती करावी. लोकप्रतिनिधींना माहिती मिळत नाही. लोकांना लॉकडाऊन नको आहे पण ते निर्बंध पाळत नाहीत. दरम्यान, सायंकाळी सहा नंतर हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद करणे चुकीचे होईल असे देखील त्यांनी भूमिका मांडली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, लॉकडाऊन करून उपयोग होणार नाही. मृत्यूदर कमी करणे यासाठी आपण काय करूशकतो तसेच प्रसार कमी करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. लग्न सोहळे, दशक्रिया विधीसाठी मास्क आणि फेसशीट अनिर्वाय केले पाहिजे. रूग्ण किती आणि ऑक्सिजन बेड किती याचा ताळमेळ बसत नाही. औद्योगिक क्षेत्रात डोअर स्टेप लसीकरण केले पाहिजे अशी भुमिका त्यांनी मांडली. व्हेंटिलेटर बेड वाढवले पाहिजेत असेही ते म्हणाले. लॉकडाऊन करून उपयोग होणार नसेल तर ग्रामीण भागात ऑक्सिजन बेड वाढवले पाहिजेत अशी भूमिका आमदार राहूल कुल यांनी मांडली आहे. बैठक सुरू असून निर्णय थोड्याच वेळात होणार आहे. बैठक अद्यापही सुरू आहे.