नवी दिल्ली ः मागील आठवड्यापासून कृषी कायद्याविरोधी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी दिल्ली धडक दिलेली आहे. सरकारसोबत चार वेळा चर्चा करण्यात आली. मात्र, कोणत्याही चर्चेत सरकारला यश आलं नाही. शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहे आणि त्यांनी संसदेला घेरण्याचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकार आणि संयुक्त शेतकरी संघटनांमध्ये चार वेळा चर्चा झाली. मात्र, कुठलाही चर्चेत सरकारला यश आले नाही. पुन्हा आज दुपारी २ वाजता पाचव्यांदा चर्चेसाठी केंद्र आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र, या चर्चेत मागण्या मान्य केल्या नाही तर, संसदेला घेराव घालू, अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
आजची बैठक होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नरेंद्र सिंह तोमर, पियूष गोयल हे सर्व जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी दाखल झालेले आहेत. आज नेमका कोणता निर्णय होणार आहे किंवा शेतकरी आंदोलन चिघळणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिलेले आहे.