बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे आमचे सरकार : एकनाथ शिंदे

0

पिंपरी : राज्यात यापूर्वी सिंचनावर 70  हजार कोटी रुपये खर्च झाले. तरी सिंचन झाले नव्हते. आमच्यासरकारने सिंचन योजना वाढविली असून  आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देतनाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप, दाखले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या हस्ते देण्यात आले.

थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदीउपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रशासनाने लोकप्रतिनिधींचे ऐकलेच पाहिजे. लाखो लोकांतून ते निवडून आलेले असतात. अधिकाऱ्यांनी इगोठेवू नये. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एका रथाचे दोन चाके आहेत. आपले सरकार येण्यापूर्वी सरकार बंद होते. लॉकडाऊन लावलेजात होते. घाबरून घरी बसविले जात होते. आम्ही सर्व उघडलेसण मोठ्या उत्साहात साजरे केले. लोक बाहेर पडल्याने कोरोना पळूनगेला.

Leave A Reply

Your email address will not be published.