ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

0

चेन्नई : ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या कोल्हापूरच्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू झाला आहे. डॉ. काकडे हे चेन्नई येथे एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तब्येत बिघडत गेली आणि त्यांना ऑक्सिजनची गरज लागली. मात्र, अखेरपर्यंत त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. काकडे आणि त्यांच्या पत्नी चेन्नईतील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत होते. तेथील लॅबमध्ये काहीजणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काकडे यांनीही आपली कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार सुरू झाले. काही दिवसांनी त्यांना श्वसनाला त्रास होऊ लागला. त्यांच्या विद्यार्थ्यानी शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र, तेथे त्यांना नीट उपचार मिळाले नाहीत.

शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात उच्चशिक्षण घेतल्यानंतर त्यांना परदेशात अनेक संधी होत्या. मात्र, त्यांनी संशोधन करण्याचा निर्णय घेतला. ऑक्सिजन, हायड्रोजन वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्यावर रेल्वेही धावू शकेल, असे संशोधन त्यांनी सुरू केले. यापाठोपाठ सात पेटंटही मिळविली.

Leave A Reply

Your email address will not be published.