भारतावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट उघड

 दहशतवादी संघटनांकडून चिनी बनावटीचे अपग्रेडेड ड्रोन्सची खरेदी

0

 

नवी दिल्ली ः पाकिस्तानचा पाठींबा असलेल्या दहशतवादी संघटनांनी आणि आयएसआयने आता मोठ्या ड्रोनचा वापर सुरू केला आहे. त्यांनी नुकतीच अपग्रेडेड नव्या ड्रोन्सची खरेदी केलेली आहे, अशी माहिती दिल्लीतील दहशतवाद विरोध पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. असे वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले आहे.

भारतीय नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना हल्ले करता येत नाहीत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना या पंजाबमध्ये ड्रोनद्वारेच शस्त्रात्रे टाकतात, तसेच जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करण्यासाठी शस्त्रास्त्रे पाठवली जातात, या गोष्टी इंटेलिजन्सकडून पुढे आलेल्या आहेत.

दिल्लीतील आंदोलनात खलिस्तानी गटांनी शिरकाव केल्याचे रिपोर्ट आहेत. त्यांना पंजाबमधील दशतवाद पुन्हा जीवंत करायचा आहे. यामुळे शस्त्रास्त्रे पोहोचविण्यासाठी अपग्रेडेड ड्रोन्सचा वापर होऊ शकतो, असेही गुप्तचर यंत्रणांनी सांगितलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.