परमबीर सिंग आणखी ‘गोत्यात’ ! अटकेतील पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

0

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन पोलीस निरीक्षकांना न्यायालयात हजर करण्यात आले असता गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन घेतल्याचे समोर आले आहे.

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती.।या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  दोन पोलीस निरीक्षकांना अटक केली आहे. नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहे. गोपाले आणि कोरके या दोघांना आज किला कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने दोघांची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली.

सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे की, या दोघांनी तक्रारदाराकडून पैसे घेण्याकरता हवालाचा वापर केला. परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता. हवाला ऑपरेटर मोमिन यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाला.10 रुपयांची नोट 50 लाख रुपयांच्या हवाला व्यवहाराचा कोड होता. पोलीस निरीक्षक आशा कोरके यांनी हवाला मार्फत पैसे घेतले होते. पैशाची देवाणघेवाण होताना चॅटिंगद्वारे कन्फर्मेशन दिले होते. सरकारी वकिलांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात अजामिन पात्र वॉरंटची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.