“अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड”

0

मुंबई : शंभर कोटी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून  चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान अनेक वेगवेगळे धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत. तसेच बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अनिल देशमुख गंभीर आरोपही करत आहेत. त्यानंतर देशमुख यांनी परमबीर सिंहबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

”अँटिलिया प्रकरण, मनसुख हिरेन हत्या कटाचे परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड” असल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी ईडीसमोर केला आहे. अनिल देशमुख यांनी सांगितले की, ”अँटिलियासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर दिशाभूल करत होते. कारण या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते आणि परमबीर हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असे आपल्याला समजले होते. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितलं.”

पुढे अनिल देशमुख म्हणाले, ”सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काड्या लावल्याचा आरोप होता, याप्रकरणी वाझे यांना NIA ने अटक केली होती. ब्रीफिंगसाठी बोलावले होते, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि परमबीर यांना बोलावले तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंगवेळी अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या बाबत परमबीर देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती. यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास ATS कडे सोपवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.