पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार मंगळवारी ट्विटरवर चांगलेच सक्रिय दिसले. पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील रुग्णालयाच्या फायर ऑडिट बाबत ट्वीट केले तसेच, मावळ मधील भात पिकाचे नुकसान आणि रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ट्वीट करत मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे, अशी टिप्पणी केली आहे.
पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन, ‘मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी येताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. अपघात वाढले आहेत. पवन-अंदर मावळातील अशा प्रश्नांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे. मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे.’
मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी येताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. अपघात वाढले आहेत. पवन-अंदर मावळातील अशा प्रश्नांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे. मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे. #maval
— Parth Pawar (@parthajitpawar) November 9, 2021
तसेच, ‘अवकाळी पावसामुळे मावळ परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांच्या पावसाने कापणीला आलेला भात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाद्वारे मावळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.’ असे ट्विट पार्थ पवार यांनी केले आहे.
त्यापूर्वी पार्थ पवार यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ‘पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अनेक रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही अत्यंत गंभीर असून, निष्पाप रुग्णांचा होरपळून बळी जाण्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका स्तरावर तत्काळ उपाययोजना कराव्यात.’ असे ट्विट केले होते.