पक्षांतरासंबंधी निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील ः भुजबळ 

0

नाशिक : ”राज्यातील बरेच नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये यायला इच्छूक असले तरी, त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही. महाविकास आघाडींतर्गत कोणतेही पक्षांतर करण्यापूर्वी संबंधित पक्षश्रेष्ठींची संमती गरजेची आहे”, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

”बाळासाहेब सानप यांच्यासारखे अनेक जण राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असले तरी महाविकास आघाडीतील पक्षांतराबाबतचा  निर्णय हे संबंधित पक्षाचे पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. पक्षांतरासंदर्भात अनेक इच्छुक असतात आणि भेटीगाठीही होत असतात, मात्र त्याबाबत आता काही बोलणार नाही”, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.
नाराजी हा शब्द माध्यमांचा शब्द : काॅंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले की, ”सोनिया गांधी नाराज आहेत, या चर्चेमध्ये काही तथ्य नाही. नाराजी हा शब्द माध्यमांनी पसरवलेले शब्द आहे. वंचित आणि मागास घटकांना न्याय द्यावा, हे पूर्वीपासूनच काॅंग्रेसचे धोरण आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावे, असे सांगण्यात काही वावगे नाही.

संबंधित बातमी : उपेक्षित-वंचित वर्गासाठी कल्याणकारी योजना राबवा 

Leave A Reply

Your email address will not be published.