पवना धरण 86 टक्के भरले; पावसाची जोर कमी

0

मावळ : पिंपरीचिंचवडकर आणि मावळवासीयांना वर्षभर पाणी देणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या 24 तासात 22 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा 86.34 टक्यांवर गेला आहे.

पवना धरणातून पिंपरीचिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरणमुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे. महापालिका पवना नदीतून रावेत येथील बंधायातून अशुद्धजलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

धरणातील पाण्याची परिस्थिती!

  • गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 22 मिली मीटर
  • 1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 1790 मिली मीटर
  • गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 1581 मिली मीटर
  • धरणातील सध्याचा पाणी साठा – 86.34 टक्के (Pavana Dam)
  • गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 81.30 टक्के
  • गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 2.35 टक्के
  • 1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 68.44 टक्के
Leave A Reply

Your email address will not be published.