मावळ : पिंपरी–चिंचवड शहर वासियांना पिण्याचे पाणी मिळणारे मावळातील पवना धरण आज गुरुवारी सकाळ प्रयत्न 73.59 टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या 24 तासात 82 मिली मीटर पावसाची नोंद झालीआहे.
पवना धरणातून पिंपरी–चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरणमुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले आहे.
महापालिका पवना नदीतून रावेत येथील बंधा–यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुनशहरवासीयांना पुरवठा केला जातो.
धरणातील पाण्याची परिस्थिती!
गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 82 मिली मीटर
1 जूनपासून झालेला एकूण पाऊस – 1559 मिली मीटर
गेल्यावर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस – 1580 मिली मीटर
धरणातील सध्याचा पाणी साठा – 73.59 टक्के
गेल्यावर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा – 80.46 टक्के
गेल्या 24 तासात पाणी साठ्यात झालेली वाढ – 3.70 टक्के
1 जूनपासून पाणी साठ्यात झालेली वाढ – 55.59 टक्के
मागील वर्षी आजच्या तारखेला पाणी साठा जास्त होता. यंदा उशिरा पाऊसाने सुरुवात केली त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत गतवर्षी 5 टक्के कमी पाणी साठा धरणात आहे. मात्र पावसाची हजेरी अशीच राहिली तर लवकरच पवना धरण 100 टक्के भरेल.