पुणे : शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) विकास अधिकाऱ्यासह दोघांना किसन कर्ज प्रकरणात ५ हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
दीपक सायकर (३८) व गोपीनाथ इंगळे (२७) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांचे पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) प्रकरण मंजूर करण्यासाठी लोकसेवक यांनी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे दिसून आले. विभागाने आज लाच घेताना दीपक सायकर याला पकडले आहे.
दीपक सायकर हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकास अधिकारी आहेत. तर गोपीनाथ हे बोह्वाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित येथे सचिव आहेत.