शेतकरी आंदोलन; ट्रॅक्टर रॅलीत घातपाताचा कट उधळला

0
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची ट्रॅक्टर रॅली काढण्याची ठरवले आहे. ही रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडण्याचा कट होता; तो कट समोर आला आहे. शुक्रवारी रात्री घुसलेल्या एका शुटरला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या कथित शुटरला चेहरा झाकून प्रसारमाध्यमांसमोर आणण्यात आले. सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या शुटरला पकडले आहे. हा शुटर शेतकरी नेत्यांना मारण्यासाठी आला होता. त्याने मीडियासमोरच दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

या शूटरने सांगितले की, 26 तारखेला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये गोळ्या झाडून वातावरण खराब करायचे होते. याचबरोबर 23 ते 26 जानेवारीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडायच्या होत्या. तसेच त्याच्यासोबत आणखी काही जण असून यामध्ये महिलाही आहेत. या महिलांचे काम आंदोलकांना भडकविण्याचे होते.

या शुटरने जाट आंदोलनातही गोंधळ घालण्याचे काम केल्याचे कबूल केले आहे. शूटरने सांगितले की, 26 तारखेला चार लोक स्टेजवर असणार होते. त्यांना गोळ्या झाडण्याचे आदेश होते. यासाठी या चार लोकांचे फोटो मला देण्य़ात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.