‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं’

निलोफर मलिक-खान यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल

0

मुंबई : आर्यन खान कारवाई नंतर चर्चेत आलेल्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले आहेत. हे सर्व सुरु असताना आता त्यांची मुलगी निलोफर मलिक-खान यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

समीर वानखडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतर मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर पत्र शेअर केलं आहे. यातून त्यांनी ‘ड्रग पेडलरची बायको म्हणून लोकांनी हिणवलं’ असं लिहित हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिने पती समीर खानच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर खुले पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहे.

निलोफर यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे यांना या प्रकरणातून हटवल्यानंतरही निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. ‘जनतेला गृहीत धरले जाऊ नये. जे अपराधी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि इतर लोकांना आवाहन करते की त्यांनी पुढे यावं आणि आमच्याबरोबर अन्यायाविरुद्ध लढा द्यावा’ असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक ट्विट करत निलोफर मलिक यांनी सोशल मीडियावर खुले पत्र शेअर केले आहे.

हे पत्र शेअर करताना कॅप्शनमध्ये त्यांनी ‘एका निष्पापाच्या पत्नीचे खुले पत्र’ असं म्हणत ‘सुरुवात’ असं लिहिलं आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे यावर आता विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.