1500 स्क्वेअर फुटाच्या घरासाठी परवानगीची गरज नाही

0
औरंगाबाद :1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नसल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला असून, 31 डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित केली जाणार आहेत.

यामुळे राज्यातील 55 हजार कुटुंबांना गुंठेवारीचा फायदा होणार असून, 3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं.

सध्या राज्यभरात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणीही त्यांनी भाष्य केलं. पूजा चव्हाण प्रकरण संवेदनशील असून, या विषयात मला जास्त माहिती नाही. माहिती घेऊनच या विषयावर बोलणार असून, सध्या बोलणं उचित नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.

“झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.