पेट्रोल, डिझेल नंतर सीएनजी महागला

0
मुंबई : पेट्रोल, डिझेल पाटोपाठ आता सीएनजी देखील महागात आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या प्रती किलोसाठी दरवाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार सीएनजीच्या दरात 2.58 रुपये तर पीएनजीच्या दरात 55 पैशांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  काल मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
या नव्या दरवाढीमुळे ग्राहकांना प्रती किलो सीएनजीसाठी 51.98 रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या स्लॅब वनसाठी 30.40 एससीएम तर स्लॅब 2 साठी 36.00 रुपये मोजावे लागणार आहे.
वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता  सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांच्या घरातील बजेटही कोलमडणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.