जमावबंदी केल्यानंतर लोणावळा परिसरातील रविवारचे चित्र

0
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे आज रविवार असून देखील लोणावळा तसेच पुणे , पिंपरी चिंचवडच्या आसपासच्या परिसरात कमी प्रमाणात पर्यटक दिसत आहे. यामुळे अनेक ठिकाणं रिकामी रिकामी दिसत आहेत.
लोणावळा-खंडाळा परिसराचे पावसामुळे सौदर्य वाहत आहे. मात्र प्रशासनाने लागू केलेल्या कडक नियमामुळे वाहतूकही कमी प्रमाणात आहे.
सह्यादीच्या पर्वत रांगावर धुक्याची चादर पांघरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुण्यातील पर्यटकांसाठी अतिशय हवा हवासा असणारा भुशी डॅम भरुन वाहत आहे. मात्र जमावबंदी मुळे पर्यटकांविना सुना सुना आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.