पुणे : येलमार समाजाचे कार्यकर्ते सुभाष येलमार यांची पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. यासाठी येलमार समाज प्रतिष्ठाणच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, ठाणे बिल्डरअसोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, ज्येष्ठ नेते रंगनाथ येलमार, युवा नेते शशिकांत येलपले, बाळासाहेब लोकरे, अमोल माडगूळकर, चंद्रकांत चौगुले, डॉ. श्रीधर येलमार, भाऊसाहेब कंडरे, प्रवीण चौगुले, योगेश विभुते, ऍड. श्रीधर येलमार, बापू कोळवले, प्रा. राजेंद्र कंडरेआदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे येथे रविवारी पार पडलेल्या येलमार समाजाच्या मीटिंगमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. शहरात चार शाखा असणाऱ्यासहकारी बँकेच्या संचालकपदी नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छादिल्या.