पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अटकेत

0

पुणे : राज्यात रेमडिसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा आहे. या इंजेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. अश्यातच पिंपरी चिंचवडनंतर पुणे पोलिसानी रेमडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका महिलेसह दोघांना अटक केली आहे.

पृथ्वीराज संदीप मुळीक (22, दत्तनगर) व नर्स नीलिमा किसन घोडेकर (गोल्डन केअर हॉस्पिटल, भूमकर चौक, हिंजवडी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही गंभीर रुग्णांना लागणारे रेमडिसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्याचा तुटवडा आहे. त्याचाच काहीजण फायदा घेत या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत आहेत. त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न केले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात चौघांना रेमडिसिवीर इंजेक्शनची विक्री करताना पकडले गेले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील शहरात वेगवेगळ्या पथकांना यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दरोडा व वाहनचोरी पथक माहिती घेत असताना त्यांना दत्तनगर परिसरात एकजण या इंजेक्शनची अधिक किमतीने विक्री करत आहे. यानुसार याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पथकाने सापळा रचून मुळीक याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला हे इंजेक्शन हिंजवडी येथील भूमकर चौकात असलेल्या गोल्डन केअर रुग्णालयातील नर्स मैत्रिणीने दिले आहे. त्यानंतर तिला देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास केला जात आहे.

दरम्यान, रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी पोलिसांनी 10 पथके तयार केले आहेत. त्यानुसार माहिती घेऊन कारवाई केली जात आहे, तर नागरिकांना काही वेगळे आढळून आल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण, निलेश शिवतरे, धनंजय ताजने, गणेश पाटोळे, अतुल मेंगे, गणेश ढगे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, तऋषीकेश कोळप यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.