दिव्यांग मुलांसाठी प्रकल्प राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली महापालिका

0
पिंपरी : बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांसाठी लवकर निदान व लवकर उपचार प्रकल्प राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे; असे मत महापौर उपा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे . यांच्या संयुक्त विद्यमाने बालवाडी स्तरावर दिव्यांग मुलांचे लवकर निदान व उपचाराचे महत्त्व आणि बालवाडी ताईची भूमिका त्यांची कार्यपध्दती या विषयावर बालवाडी ताईसाठी कार्यशाळेचे आयोजन आचार्य आत्रे रंगमंदिर पिंपरी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते नामदेव ढाके, तज्ञ सल्लागार समीर घोष , उप आयुक्त अजय चारठाणकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कार्गातीवर , समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, प्रहार संघटनेचे दत्ता भोसले , राजेंद्र वाघचौरे , मनिता पाटील, भाग्यश्री मोरे, रविंद्र झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते .

विषय तज्ञ म्हणून डॉ.कल्याणी मांडके यांनी सदरील प्रकल्प केरळ व तमिळनाडू या सारख्या राज्यांनी यापूर्वीच सुरू केला असून महाराष्ट्रामध्ये पहिलीच महानगरपालिका असल्याने अभिनंदन करायला हवे असे सांगितले. यावेळी त्यांनी दिव्यांग बालक व त्यांच्या विकासात्मक प्रक्रियेत बालवाडी ताईची भूमिका या विषयावर प्रकाश टाकला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समाज कल्याण विकास आदी शब्दांच्या पलीकडे जाऊन न्याय भूमिकेतून दिव्यांगांसाठी कार्य करावे असे मत व्यक्त केले.

यावेळी विषय तज्ञ शालिनी सिंग यांनी बालवाडी स्तरावरील अंमलबजावणी प्रक्रिया विषद केली त्यांना मनीषा परब यांना सहकार्य केले. दिव्यांग सल्लागार समीर घोष यांनी बालवाडी स्तरावर लवकर निदान व लवकर उपचार हा प्रकल्प राबवून आपले वेगळे वैशिष्ठ महापालिका निर्माण करत असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.