पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिक दुर्बल घटकांना देणार ३०००हजार रुपये

0

पिंपरी : कोविडची साखळी तोडण्यासाठी राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन तातडीची मदत म्हणून ३ हजार रुपये देण्यात येणार आहे . शहरातील रिक्षाचालक ( बॅचधारक ) , परवानाधारक फेरीवाले , नोंदणीकृत घरेलु कामगार , चर्मकार ( गटई कामगार ) , नाभिक , शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक , जिम ट्रेनर इ . आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांना मदत दिली जाणार आहे .

कोविड संसर्ग टाळण्यासाठी शासनाने राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे . यामुळे या आर्थिक दुर्बल घटकातील हातावर पोट असलेल्या लोकांवर आर्थिक संकट ओढवुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . यावर आवाज उठवुन राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेवुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही रुग्णवाढ रोखण्यासाठी कडक निबंध , लॉकडाऊन करणे आवश्यक वाटत आहे . . पण , घाईघाईने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजातील अनेक घटकांना बसणार आहे .

घाईघाईने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचा फटका समाजातील अनेक घटकांना बसणार आहे . यामुळे प्रथम लॉकडाऊनचा फटका ज्यांना ज्यांना बसू शकतो , त्या सर्वांना पॅकेज देणे आवश्यक आहे , अशी मागणी केली होती . परंतु अशा सामान्य घटकांचा विचार न करता तोंडाला पाने पुसणारे तुटपुंजे पॅकेज जाहीर करुन राज्यशासनाने लॉकडाऊन करण्याचा अट्टहास केला . यामुळे गोरगरीब , कामगार , मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे .

पारंपारिक व्यवसाय करुन उदरनिर्वाह चालविणाऱ्या लोकांचे कोविडमुळे संपुर्ण व्यवसाय उद्वस्त झाले आहेत . अशा अडचणीच्या काळात शहरातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या या घटकाला दिलासा देणेसाठी लॉकडाऊन काळात महापालिकेने आर्थिक मदत करावी या संदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज ( दि . १५ ) पत्राद्वारे मागणी केली .

पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांनीदेखील याबाबत सुचना दिल्या आहेत . त्यानुसार आज झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये राज्यशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात शहरातील रिक्षाचालक ( बॅचधारक ) , परवानाधारक फेरीवाले , नोंदणीकृत घरेलु कामगार , चर्मकार ( गटई कामगार ) , नाभिक , शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे चालक , जिम ट्रेनर इ . आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणीकृत व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येवु नये म्हणून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला .

राज्यामध्ये अशी स्वतंत्र मदत करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका ठरली असुन मदतीची ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे . अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे , स्थायी समिती अध्यक्ष अॅड . नितिन लांडगे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रसिध्दीसाठी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.