पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा फेरबदल

वाचा सविस्तर...

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ निरीक्षकांच्या आज बुधवारी रात्री उशिरा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धस यांना पदोन्नती मिळाल्याने ते पद रिक्त झाले होते. त्या रिक्त पदावर नवी मुंबई येथून आलेले अशोक लालसिंग रजपूत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
भोसरी वाहतूक विभागाचे निरीक्षक सुधीर अस्पत यांची वाहतूक नियोजन येथे बदली करण्यात आलेली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार गौर यांची बदली एमोबी आणि पीसीबी विभागाला करण्यात आलेली आहे.
शिरगाव पोलीस चौकीचे निरीक्षक किशोर म्हसवडे यांची बदली विशेष शाखा दोन येथे करण्यात आलेली आहे.

पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांची बदली शिरगाव पोलीस चौकी येथे करण्यात आलेली आहे.
आळंदी-दिघी वाहतूक विभागाचे निरीक्षक सुनील टोणपे यांची बदली पिंपरी गुन्हे येथे करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्त यांचे रिडर सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांची बदली एमओबी आणि पीसीबी विभागात करण्यात आलेली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.