पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम, सर्वप्रथम हिंजवडीमध्ये कार्यान्वीत

0

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपुर्ण शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठीज्येष्ठानुबंधहा उपक्रमराबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठानुबंध उपक्रमाची सुरूवात हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून करण्यात आली असून बावधनयेथील सुर्यदत्ता कॉलेज येथे पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सहाय्यतामेळावा संपन्न झाला. यावेळी पोलिस आयुक्तांनी ज्येष्ठानुबंध हा उपक्रम पिंपरीचिंचवड शहरात सर्वत्रच राबविला जाणार असल्याचेसांगितले.

प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सदाबहार सिनियर्स संघाच्या ज्येष्ठ नागरिकांनीस्वागतगीत सादर केले. ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज पाहणारे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव यांनी ज्येष्ठ नागरिककक्षाबाबतच्या कामकाज कायद्याविषयी पीपीटी व्दारे माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांनी सायबर फसवणुक होण्यापासून कसे सावधरहावे याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक पानमंद यांनी मार्गदर्शन केले.

सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी प्रस्ताविकात ज्येष्ठ नागरिकांपैकी ऐकटे/दुकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांची माहितीदेवुन त्यांची देखभाल करण्याकरिता प्रत्येकी 1 अंमलदार यांची नेमणुक करून काही समस्या अथवा अडचण निर्माण झाल्यास त्यांनीतात्काळ संबंधित अंमलदार यांच्याशी संपर्क करण्याबाबत सूचना दिल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेवून पोलिस आयुक्तविजयकुमार चौबे यांनी त्यांच्या शंकांचे समाधान केले.

ज्येष्ठ नागरिकांशी पोलिसांचा ऋुणानुबंध निर्माण करीत ज्येष्ठ नागरिकांशीकायम संपर्कात राहुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच्या उपक्रमास ज्येष्ठानुबंध असे नाव देवुन सदर नावाच्या फलकाचेमान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अनावरण करण्यात आले. पोलिस आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिकांना येणार्‍या दैनंदिन समस्या त्यानिवारण्यासाठी पोलिसांचा सहभाग या बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ज्येष्ठानुबंध या उपक्रमाचे महत्व विशद केले. असाच उपक्रम पुर्णआयुक्तालय हद्दीत लवकरच राबविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष म्हणून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त संजय शिंदे, वाकडविभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे, हिंजवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, ज्येष्ठनागरिक कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयुटसचे संजय बी. चोरडीया, सुषमा चोरडीया, माजीनगरसेवक किरण दगडे, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, सदाबहार सिनिअर्स संघाचे (बावधन) अध्यक्ष नीलकंठ बजाज यांच्यासहइतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये तब्बल 225 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक सहाय्यता मेळावाकार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.जे. अक्षय यांनी केले. डॉ. विवेक मुगळीकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.