पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’; 13 जणांना ताब्यात घेत 8 शस्त्रे, 9 किलो गांजा जप्त

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहीम राबवली. यामध्ये 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून आठ घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. तसेच 185 वाहन चालकांवर कारवाई, मध्यपान करुन वाहन चालविणाऱ्या 22 जणांवर कारवाई, 21 हॉटेल चालकांवर खटले, प्रतिबंधात्मक कारवाई आणि 8 किलो 700 ग्राम गांजा जप्त केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडा विरोधी पथकाने चिखली-मोई रोडवर चाकण एमआयडीसी मध्ये कामावर जाणाऱ्या कामगारांना प्रवासी म्हणून रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी पकडली. सिद्धार्थ कल्याण सोनवणे (वय 18), दयानंद बालाजी घाडगे (रा. 18, दोघे रा.  चिंचवड) आणि दोन अल्पवयीन साथीदार यांना यांना ताब्यात घेऊन दोन लाख 31 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल त्यात रिक्षा, दोन सुरे, दोन लॅपटॉप, चार्जर, माऊस, दोन मोबाईल, सॅक बॅग, मनी पर्स, क्रेडिट व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले. या आरोपींची यापूर्वी रात्रीच्या वेळी लोकांना लुटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तसेच अली तैयब सैयद (19, रा. आकुर्डी गावठाण) याच्याकडून एक तलवार, अंकित अनिल मारसनळी (19, रा. आकुर्डी) यांच्याकडून एक रॅम्बो तलवार, शिवम सुनील दुबे (20, रा. आकुर्डी) याच्याकडून एक कोयता, साईनाथ विष्णू बुरसे (20, रा. दिघी) याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनने शुभम उर्फ चिम्या शिवदास पवार (20, रा. निगडी), दीपक मारुती राजगुरू (25, रा. निगडी) यांना ताब्यात घेऊन सहा घरफोड्यातील 1 लाख 2 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुरेश उर्फ सुरज हरिद्वार गुप्ता (31, रा. भोसरी) याला अटक केली. या कारवाई मुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील सहा गुन्हे उघडकीस आले. गुन्हे शाखा युनिट 4 ने अक्षय दशरथ शिंदे (22, रा. पिंपळे गुरव) याच्याकडून कोयता, दीपक शशिकांत पवार (23, रा. निगडी) याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.