पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचा भारत-नेपाळ सीमेवर थरार
खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना केलं जेरबंद
पिंपरी : चिखली येथील सोन्या तापकीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भारत–नेपाळ सीमेवरून अटक केली. मुसळधार पावसात शेतात पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
करण रतन रोकडे (25, रा. चिखली), ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे, रिंकू दिनेश कुमार (19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एकाअल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी चिखली येथे दोघांनी सोन्या तापकीर याचा गोळ्या झाडून खूनकेला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना पकडले. अद्याप मुख्य सूत्रधार करण रोकडे फरार होता. त्याच्या मागावर पोलीसपथके होती. गुंडा विरोधी पथकाला आरोपींचा ठावठिकाणा लागला.
मुख्य आरोपी करण रोकडे, त्याचा लहान भाऊ आणि अन्य दोघेजण भारत नेपाळ सीमेवरील एका गावात असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मथुरा शहरापासून 750 किलोमीटर दूर असलेल्या मऊ जिल्ह्यातील मधुबन गावातसापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून शेतात पळ काढला. भर पावसात गुंडा विरोधीपथकाने शेतात पाठलाग करून चौघांना पकडले.
अटक टाळण्यासाठी आरोपी लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश येथे पळून जात होते. आरोपी करण रोकडे याच्यावरनिगडी, देहूरोड, चिंचवड, चिखली, रावेत, शिक्रापूर, बंडगार्डन पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत. आरोपी मुंग्या रोकडे याच्यावरनिगडी, चिखली, चाकण, निगडी, लोणीकंद पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी रिंकू कुमार याच्यावर चिखली पोलीसठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीसउपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे हरीश माने, सहाय्यकपोलीस निरीक्षक सागर पानमंद, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली.