पिंपरी चिंचवड शहराला मिळणार शासकीय अभयांत्रिकी महाविद्यालय

0
पिंपरी : चिंचवड शहरावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विशेष प्रेम आहे. आणि ते आज पुन्हा दिसले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास चिखली येथे विस्तार केंद्र स्थापन करण्यास 11.30 हेक्टर शासकीय जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते . संस्थेच्या विस्तारित केंद्रामध्ये 8 उत्कृष्टता व विकासकेंद्र आणि संशोधन तसेच नाविन्यता पार्क सुरु करण्यास मान्यता देण्यात आली .

या केंद्रांद्वारे प्रस्तावित सर्व अभ्यासक्रम हे कायम विना – अनुदानित व स्वयंअर्थसहायित तत्वावर संस्थेमार्फत चालविण्यास परवानगी देण्यात आली . या केंद्राच्या बांधकाम व साधनसामुग्रीकरीता लागणारा एकवेळचा निधी म्हणून 150 कोटी रुपये इतका निधी पुढील 3 ते 4 वर्षामध्ये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.