पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालणार

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराबाबत लक्ष घालुन योग्य त्या चौकशी करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कष्टकरी जनता आघाडीच्या शिष्टमंडळाने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत निवेदन दिले. या वेळी पवार यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती कष्टकरी जनता आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते  बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. भ्रष्टाचाराबाबत तसेच स्थायी समितीमध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये हजार कोटींच्या निविदा मंजूर केल्या जात आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्याबाबत सातत्याने प्रश्न लावून धरले तरी सत्ताधारी त्याकडे सकारात्मक पाहत नाहीत. ठेकेदार आणि त्यांचे हित सत्ताधारी पाहत आहेत. या सह पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक गैरकारभाराच्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.

या तक्रारीची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करू. तसेच नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.