पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. शहरात अगोदरचसाथीच्या रोगांनी थेमान घातले असताना पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे यात आणखी भर पडलेली आहे. गेली पंधरा दिवसांपासूनदेहू–आळंदी रस्त्यावरील चिखली परिसरातील सहा ते सात हौसिंग सोसायट्यांना पिण्याच्या पाईप लाईन मधून ड्रेनेज लाईनचेमैलामिश्रित दूषित पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच हा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास आम्हीहेच दूषित पाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाजू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
देहू–आळंदी रस्त्यावरील अभंग विश्व फेज-1, अभंग विश्व फेज-2, मिरा ऑर्किड, भागीरथी ग्लोरिया ,गवारे अंगण या सर्वसोसायट्यांमधे मैलामिश्रित पाणी येत असल्याने या सर्व सोसायट्यांमधील लहान मुले,महिला,वयोवृद्ध नागरिक हे जुलाब ,उलट्यायासारख्या आजाराने त्रस्त आहेत. या भागामध्ये जाणारी ड्रेनेज लाईन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पाण्याची लाईनएकावरून एक जात असल्याने ड्रेनेज लाईनचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईन मध्ये मिक्स होत आहे.
आयुक्तांकडे तक्रार; चार हजार नागरिकांचा प्रश्न
देहू–आळंदी रस्त्यावरील सहा मोठ्या सोसायट्यामध्ये दूषित पाणी येत असल्याने या परिसरातील फेडरेशन तर्फे पिंपरी चिंचवडमहानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टकले तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी यांना माहिती कळवली. मात्रपंधरा दिवस होऊनही यावर काहीच केलेलं नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या परिसरातील 4000 नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याशी चर्चा करून निवेदनदिलेले आहे.
लवकरात लवकर हे ड्रेनेजचे मिक्स होणारे पाणी शोधून काढावे. जोपर्यंत हे मिक्स होणारे पाणी सापडत नाही तोपर्यंत आपल्या पिंपरीचिंचवड महानगरपालिकेकडून या भागातील सोसायटी धारकांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच ड्रेनेज आणिपिण्याच्या पाण्याच्या लाईन या दोन्ही लाईन चेक करून त्या परत व्यवस्थित टाकून नागरिकांना व्यवस्थित आणि स्वच्छ पाणीपुरवठाकरण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केलेली आहे.