पीएमसी बँक : हितेंद्र, भाई ठाकूर यांची 34 कोटींची मालमत्ता जप्त

0
मुंबई : पीएमसी बँकेतून बेकायदेशीरपणे कर्ज घेऊन त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी ईडीने अनेक उद्योगसमूहावर मनी लॉन्ड्रिंग अंर्तगत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार गेल्या महिन्यात वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर व भाई ठाकूर यांच्या विवा समूहाची कार्यालये तसेच घरावर छापे टाकले होते. त्यामध्ये आढळलेल्या काही आक्षेपाहार्य बाबीमुळे पीएमसी घोटाळ्यात सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ईडीने ठाकूर यांच्या विवा समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे व विरारमधील फ्लॅट, कार्यालये, फार्महाऊस, आदींचा समावेश आहे. दरम्यान, कारवाई केल्या मालमता जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मालकीच्या मालमत्ता आहेत. याप्रकरणी ठाकूर बंधूंना लवकरच चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याचे हद्दीतील सूत्रांनी सांगितले.

पीएमसी घोटाळ्याप्रकरणी व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर व संचालक मदन चतुर्वेदी यांना २३ जानेवारीला अटक केली होती. तसेच ठाकूर बंधूंच्या घरावर व विवा समूहाच्या कार्यालयावर छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाकूर यांची अंधेरीतील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीतील सूत्रांनुसार, मॅक स्टार ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. मॅक स्टार या कंपनीने अंधेरी पूर्वेतील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता बांधली आहे. पीएमसी बँक गैरव्यवहारातील एचडीआयएल ही सर्वांत मोठी कर्जबुडवी कंपनी आहे. एचडीआयएल, मॅक स्टार व विवा समूह यांच्यात संगनमत असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

जप्त करण्यात आलेल्या दाेन कार्यालयांचा समावेश असून, कागदोपत्री या दोन मालमत्तांची किंमत ३४ लाख ३६ हजार इतकीच दाखविण्यात आली आहे. त्यापोटी विवा समूहाने मॅक स्टारला ३७ चेक दिल्याचे तपासात आढळले आहे. राकेश वाधवान यांनी एचडीआयएल कंपनीमार्फत विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात निधी वळविला. एचडीआयएलने येस बँकेचे कर्जही बुडविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.