पिंपरी : पिंपरी–चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवली या मध्ये विरुद्धदिशेने वाहन चालवणाऱ्या 442 वाहन चालकांवर पिंपरी–चिंचवड पोलिसांनी कारवाई केली.
पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियममोडून वाहने चालवतात. या चालकांवर कारवाई करण्यासाठी पिंपरी–चिंचवड वाहतूक पोलिसांनी 9 ते 23 मार्च दरम्यान विशेष मोहीमराबवली.
यामध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 442 वाहन चालकांवर न्यायालयात खटले भरविण्यात आले. याव्यतिरिक्त वाहतूक नियमांचेउल करणाऱ्या नागरिकांवर पिंपरी–चिंचवड वाहतूक शाखेचे मार्फत ही चलन प्रणाली द्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
वाहनांवरील दंडाची रक्कम ही मोठ्या प्रमाणात अनपेड असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या विशेष मोहिमेत वाहतूकपोलिसांनी 52 लाख 73 हजार 650 रुपयांचा दंड वसूल केला. यापुढील काळात देखील वाहतूक पोलिसांकडून अशा मोहिमा राबवूनकारवाई केली जाणार आहे.