पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांची मोठी कारवाई; 200 तरुण-तरुणी ताब्यात

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी रात्री मोठी कामगिरी केली असून सुमारे 200 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. जगताप डेअरी परिसरातील ऑलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.
कोव्हिडसंबंधी नियमांचे उल्लंघन करत सर्व राजरोसपणे सुरु होते. दारु पिऊन आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करुन तरुण-तरुणी वीकेण्ड पार्टी साजरी करत होते. ऑलो गॅस्ट्रो लॉजमधून 113, तर एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारमधून 105 तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना 50 टक्के मर्यादेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, वेटिंगला थांबलेले ग्राहक, वेटर, हॉटेल चालक यांनी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचं हॉटेल चालकांकडून पालन होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली होती. ही पथकं हॉटेलची तपासणी करुन यामध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करतात.
Leave A Reply

Your email address will not be published.