पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेलवर पोलिसांची कारवाई

0

पुणे : पहाटेपर्यंत सुरु असणाऱ्या कोरेगाव येथील हॉटेल रोव्ह (प्लन्ज) वर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.5) पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी केली आहे.


शासन नियमांनुसार मध्यरात्रीपर्यंत सर्व हॉटेल, बार, पब हे बंद होणे अपेक्षीत आहे.मात्र कोरेगाव पार्क येथील हॉटेल रोव्ह (प्लन्ज) हे पहाटे पाचपर्यंत खुले असल्याचे समोर आले.ही बाब 3 सप्टेंबर रोजीचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनास आली.तसेच इतर अनेक त्रुटीही पोलिसांना यावेळी आढळून आल्या.पथकाने  पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पुणे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे दिला आहे. 

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार,पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके,पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते,पुष्पेंद्र चव्हाण व राज्य उत्पादन शुल्क ए विभाग बीट -1 यांच्या पथकाने केली. 

Leave A Reply

Your email address will not be published.