महत्वाच्या बंदोबस्तात पोलिसांना मोबाइल वापरण्यास बंदी

0
पिंपरी : लष्कर प्रमुखाच्या पिंपरी चिंचवड भेटी दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांच्या असभ्य वर्तनुकीवर लष्कर प्रमुखांनी ताशेरे ओढले. याची दखल घेत महत्वाच्या व्यक्‍तींच्या बंदोबस्तात ज्यांना परवानगी असेल त्यांनीच मोबाइलचा वापर करावा, असे आदेश पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी काढले आहेत.
शुक्रवारी लष्कर प्रमुख पिंपरी चिंचवडच्या हद्दीतून जाणार होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताच्यावेळी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोबाइलवर बोलण्यात आणि चॅटींग करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. यामुळे बंदोबस्ताकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आहे.
पोलिसांच्या या कृत्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली. यापुढील काळात कोणत्याही महत्वाच्या बंदोबस्ताच्यावेळी ज्यांना मोबाइल वापरण्याची परवानगी दिली असेल त्यांनीच त्याचा वापर करावा. जर बंदोबस्ताच्या ठिकाणी मोबाइलवर बोलताना किंवा विनापरवाना वापर करताना आढळून आल्यास सदर बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल.
Leave A Reply

Your email address will not be published.